आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते सागावे गोठिवरे येथे साकवाचे भूमिपूजन संपन्न-
जिल्हा वार्षिक योजना कार्यक्रम २०२५-२६ मधून ६० लाखांचा निधी मंजूर-
राजापूर तालुक्यातील सागावे गोठिवरे येथील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या साकवाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून आमदार किरण सामंत यांच्या हस्ते या साकवाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना कार्यक्रम २०२५-२६ मधून सुमारे ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सागावे गोठिवरे परिसरातील ग्रामस्थांना पावसाळ्याच्या काळात वाहतुकीस मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी पाठपुरावा करून या साकवासाठी निधी उपलब्ध करून दिला.
भूमिपूजन प्रसंगी बोलताना आमदार किरण सामंत यांनी सांगितले की, “ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे. साकवाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची दळणवळणाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या कामासाठी आमदार किरण सामंत यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते विलास चाळके, लांजा चे प्रसिद्ध उद्योजक बाबाशेठ भिंगार्डे, राजू कुरूप ,रवींद्र नागरेकर,राजापूर पंचायत समितीच्या सभापती नंदनी कदम, जिल्हा परिषद सदस्य सोनाली टूकरुळ, पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ मयेकर, सरपंच मर्याद्री बोरकर, आरडीसी बँकेची संचालक मुन्ना खामकर,तालुकाप्रमुख दीपक नागले,जिल्हा परिषद सदस्य दीपक कुवळेकर, पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, ऍड.शशिकांत सुतार एड.यशवंत कावतकर, विद्याधर राणे प्रकाश पारकर, यांच्याशी गावातील ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
