रत्नागिरीआमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश–

‘नमन’ लोककलेचा अनुदान योजनेत समावेश–

मुंबई :
कोकणातील पारंपरिक ‘नमन’ या लोककला प्रकाराला अखेर राज्य शासनाच्या ‘लोककलावंतांना अनुदान पॅकेज’ योजनेत स्थान मिळाले आहे. विधानसभा सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी आणि नमन कलाकारांच्या विविध समस्यांबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नमन लोककलेचाही या योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाने अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.

यापूर्वी या योजनेत तमाशा फड, दशावतार मंडळे, डोंबारी कलापथक आणि शाहिरी पथकांचा समावेश होता. मात्र, कोकणातील पारंपरिक नमन या लोककलेला अनुदानाचा लाभ मिळत नव्हता. निलेश राणे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत विधानसभेत हा विषय प्रभावीपणे मांडला. त्यानंतर शासनाने नमनचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.

शासन निर्णयानुसार, पात्र ठरणाऱ्या नमन कलापथकांना निवड समितीच्या शिफारशीनुसार २ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत भांडवली अनुदान मिळणार आहे. तसेच प्रयोग अनुदानाचाही लाभ देण्यात येणार असून, एका कलापथकाला वर्षभरात जास्तीत जास्त २० प्रयोगांसाठी अनुदान दिले जाणार आहे.

या निर्णयामुळे विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकणातील नमन कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून अनुदानापासून वंचित असलेल्या या लोककलेला आता शासनमान्यता आणि आर्थिक बळ मिळणार असल्याने कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या निर्णयाचे श्रेय आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला दिले जात असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे कोकणातील नमन कलाकारांना राज्य शासनाच्या दरबारात योग्य सन्मान आणि हक्काचे स्थान मिळाल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...