रत्नागिरीआरेवारे समुद्रात बुडालेल्या त्या चार ही जणांनावर शोकाकुल वातावरणात करण्यात आला दफनविधी-

आरेवारे समुद्रात बुडालेल्या त्या चार ही जणांनावर शोकाकुल वातावरणात करण्यात आला दफनविधी-

रत्नागिरी –  तालुक्यातील आरेवारे समुद्रात पोहण्या साठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. अखेर त्या चार ही जणांचा शोकाकुल वातावरणात कोकण नगर येथील कब्रस्तानात दफन विधी पार पडला.. रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरील आरे वारे हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने दरदिवशी ईकडे फिरण्यासाठी शेकडो पर्यटक येत असतात.असेच रत्नागिरी ओसवाल नगर येथील एक कुटुंब शनिवारी आरेवारे येथे मौजमजा करण्यासाठी गेले होते परंतु नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. आणि अखेर तेच झाले.त्यांना पाण्यात जाण्याचा मोह आवरता आला नाही आणि अखेर एकाच कुटुंबातील चार जणांना बोलता बोलता समुद्राने आपल्या कुशीत घेतले आणि त्यांचा बुडवून दूदैवी मृत्यू झाला.बुडालेले दोघेजण रत्नागिरी ओसवाल नगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर दोघी बहीणी मुंब्रा मुंबई येथुन आल्या होत्या. बुडालेल्या चार जणांपैकी तीन महिला तर एक पुरुष आहे.
रत्नागिरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने समुद्रकिनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शनिवार आणि रविवार या दिवशी भाट्ये.मांडवी.पाढंरा समुद्र आरे वारे समुद्र किनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक वाढली आहे.

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओसवाल नगर येथून आरे वारे समुद्र येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक बुडाल्याची घटना घडली. या चार जणांमध्ये जुनेद बशीर काझी (३० ओसवाल नगर), जैनब जुनेद काझी (२८ ओसवाल नगर) उजमा समशुद्दीन शेख (१७ मुंबई मुंब्रा) उमेरा शमशुद्धीन शेख (१६ मुंब्रा) बुडालेल्या चार पैकी दोन महिला हे नुकतेच मुंबई येथून आले होते. समुद्रात उतरलेल्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जण पाण्यात बुडाले. अवघ्या काही मिनिटांत चारही जण खोल समुद्रात बुडाल्याने चारही जणांचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती स्थानिक पोलिस पाटील आदेश कदम यांनी ग्रामीण पोलिस निरीक्षक श्री यादव यांना माहिती दिली. मोठ्या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांनी घटनास्थळाला भेट दिली. चारही पर्यटकांना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले… अखेर या चार ही जणांना शोककळा वातावरणात दफन करण्यात आले.. दरम्यान पाउस सुरु असल्याने नद्या व समुद्रात जाणे धोक्याचे असल्याचे वारंवार सांगितले जात असताना ही अनेक जण नदीत व समुद्रात जातात आणि मग त्यांना नाहक आपला जीव गमावला लागतो.. यापुढे कोणीही समुद्रात जावु नये असा कडक इशारा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला आहे

Breaking News