रत्नागिरीआरे-वारे समुद्रकिनारी आढळला महाकाय व्हेल माशाचा मृतदेह

आरे-वारे समुद्रकिनारी आढळला महाकाय व्हेल माशाचा मृतदेह

आरे-वारे समुद्रकिनारी आढळला महाकाय व्हेल माशाचा मृतदेह-

👉रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आरे-वारे समुद्रकिनारी रविवारी सायंकाळच्या सुमारास एक महाकाय व्हेल मासा मृत अवस्थेत आढळून आला.समुद्रकिनारपट्टीवर एवढ्या मोठ्या आकाराचा मासा मृतावस्थेत तरंगताना दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे*.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी फिरायला आलेल्या पर्यटकांना समुद्राच्या लाटांसोबत एक मोठी वस्तू किनाऱ्याकडे सरकताना दिसली. जवळ जाऊन पाहिल्यास तो एक महाकाय व्हेल मासा असल्याचे स्पष्ट झाले. हा मासा काजिरभाटी किनाऱ्याजवळ लाटांच्या प्रवाहाने वाहत आला होता. ही बातमी समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी मासा पाहण्यासाठी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि कांदळवन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. माशाचा आकार मोठा असल्याने त्याला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
सध्या समुद्राला भरती असल्याने लाटांच्या जोरामुळे हा मृत मासा पूर्णपणे किनाऱ्यालगत येईल असा आमचा अंदाज आहे.त्यानंतर माशाचे शवविच्छेदन करून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधले जाईल आणि नियमानुसार त्याची विल्हेवाट लावली जाईल अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...