रत्नागिरीउदय सामंत प्रतिष्ठान आयोजित“स्मार्ट श्रावण सखी 2025”महाअंतिम सोहळा - रविवार दिनांक 10...

उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित“स्मार्ट श्रावण सखी 2025”महाअंतिम सोहळा – रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025

बुद्धीमत्ता आणि सौंदर्य यांचा सुरेख मिलाफ !
तयार व्हा एक आगळीवेगळी स्पर्धा जिंकण्यासाठी !

स्मार्ट श्रावण सखी या स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक 02 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्रवीर सावरकर नाट्यगृह येथे सायंकाळी 04 ते 08 या कालावधीत संपन्न होईल .

प्राथमिक फेरी मधील सहभागी स्पर्धकांमधून स्मार्ट 20 महिलांची निवड महाअंतिम फेरीमध्ये होईल

प्राथमिक फेरीचे स्वरुप खालीलप्रमाणे असेल :
पहिली फेरी : 2 मिनिटांची असेल
महिला स्पर्धकांनी पारंपारिक पेहरावात सादरीकरण करून स्वत:ची ओळख करून द्यायची आहे.
(स्वपरिचयामध्ये महिलांनी आपले पूर्ण नाव, कौटुंबिक माहिती (उदा. कुटुबांतील भुमिका इ.) , आवडीनिवडी, स्पर्धेतील सहभागाचा उद्देश याबाबत माहिती देणे महत्त्वाचे राहिल.)

दुसरी फेरी : 2 मिनिटे
 बुध्दीचातुर्य क्षमता (परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तर द्यायची आहेत.

स्पर्धेचे वेगळेपण
प्राथमिक फेरीमधुन निवड झालेल्या 20 स्पर्धकांसाठी कौशल्यावर प्रशिक्षण
 ६, ७ आणि ८ ऑगस्ट २०२५
 या तीन दिवसांत स्पर्धकांना विविध कौशल्यांवर प्रशिक्षण देण्यात येईल:
 रंगमंचावरील वावर आणि नृत्य कला
 संभाषण कौशल्य व आत्मविश्वास वाढवण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन
 योगा / मेडिटेशन / व्यक्तिमत्त्व विकास सत्र

“स्मार्ट श्रावण सखी 👸🏻2025”
महाअंतिम फेरी – रविवार दि. 10 ऑगस्ट 2025
सादरीकरण प्रकार :
 स्वत:ची ओळख करून देणे
 रंगमंचावरील आत्मविश्वासपूर्वक सादरीकरण (Catwalk Round)
 तुमच्या मधील कौशल्याचे सादरीकरण
 परिक्षकांचे प्रश्न आणि तुमची अचूक उत्तरे

नियम व अटी :
 हि स्पर्धा विवाहित महिलांसाठी आहे.
 स्पर्धा रत्नागिरी शहर व तालुका मर्यादित आहे.
 सौंदर्याबरोबर बुद्धीचातुर्य व कला यांवरही भर
 महाअंतिम फेरी पूर्वीचे सराव शिबिर अनिवार्य
 महाअंतिम स्पर्धेतील स्पर्धकांनी कार्यक्रम स्थळी सकाळी 10 वाजता येणे आवश्यक

नोंदणीसाठी संपर्क :
 संपर्क क्र. सौ. शिल्पा सुर्वे- 8975838181 /सौ. स्मितल पावसकर- 9421230177 /
सौ. कांचन नागवेकर – 9405741381

बक्षिसे :
स्मार्ट श्रावण सखी 2025 विजेती
(रोख रू. 10,000/- मुकुट, बेल्ट, साडी आणि चषक)
पहिली उपविजेती (1st Runner Up )
(रोख रू. 7000/- बेल्ट, साडी आणि चषक)
दुसरी उपविजेती (2nd Runner Up)
(रोख रू. 5000/- बेल्ट, साडी आणि चषक)

विशेष बक्षिसे
🛑 उत्तम व्यक्तिमत्व : (रोख रू. 2000/- बेल्ट, साडी आणि चषक)
🛑 उत्कृष्ट पेहराव : (रोख रू. 2000/- बेल्ट, साडी आणि चषक)
🛑 मोहक हास्य : (रोख रू. 2000/- बेल्ट, साडी आणि चषक)
🛑 उत्तम ज्येष्ठ व्यक्तिमत्व : (रोख रू. 2000/- बेल्ट, साडी आणि चषक)

स्पर्धेतील फे-या व नियम बदलण्याचे सर्व अधिकार आयोजक व परिक्षकांकडे राहतील.

Breaking News

आजीची रानभाजी बहुउपयोगी आणि पौष्टिक शेवगा

रेषेदार लांब शेवग्याच्या शेंगा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. याला मोरिंगा,...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 25/07/2025

१) मंडणगड -54.50. मिमी२) खेड - 96.71 मिमी३) दापोली...