उद्या रविवारी सकाळी 8 वाजता पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते जयस्तंभा पर्यंत निघणार शौर्यवंदना
तिरंगा रॅली..
“ वसुधैव कुटुंबकम् ” म्हणजेच सर्व जगाला आपलं कुटुंब मानणा-या भारत देशानं कधीच युद्धाचा पुरस्कार केला नाही किंवा कुणावर आक्रमण केले नाही. याचा अर्थ लष्करीदृष्ट्या आपण कधीच कमकुवत नव्हतो आणि नाही. आपल्या सुसंस्कृत सहनशीलतेचा फायदा अतिरेक्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानाने घेतला. अतिरेक्यांनी पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आणि सहनशीलतेचा अंत झाला.
भारतीय सैन्याने पूर्ण ताकदिनिशी पाकिस्तानस्थित नऊ अतिरेकी स्थळांचा विध्वंस केला आणि त्यानंतर, पाकिस्तानी सैन्य करीत असलेल्या भारतीय नागरी वस्त्यांवरील हल्ल्यांचा पूर्णपणे बिमोड करत आहे. आमच्या तिन्ही सैन्यदलांचा आणि प्रत्येक सैनिकाचा आम्हाला अभिमान आहे.
चला सर्व रत्नागिरीकरांनी एकत्र येत भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला सलाम करूयात आणि त्यांचे मनोबल वाढवूयात !…
आपला
उदय सामंत
उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा
पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा
सर्वांनी एकत्र जमायचं !!!….
रविवार दि. 11 मे 2025 रोजी सकाळी 08.00 वा. मारूती मंदिर सर्कल
रॅलीचा मार्ग : मारूती मंदिर सर्कल ते जयस्तंभ, रत्नागिरी