एकीकडे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सह जिल्ह्यात ऑपरेशन टायगर सुरू केले असतानाच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही ऍक्शन मोडवर आला असून त्यांनी तातडीने जिल्हा कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे..
शिवसेना नेते तथा माजी खासदार श्री विनायक राऊत यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कार्यकारणी बैठक गुरुवार दि.20 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वा. शिवसेना नेते तथा मा.खासदार श्री विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय यशोधन अर्पाटमेंट अभ्युदय नगर, नाचणे रोड, रत्नागिरी येथे माजी मंत्री श्री रविंद्र माने, माजी आमदार श्री बाळासाहेब माने, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख श्री संजय कदम, प्रभारी जिल्हाप्रमुख श्री दत्तात्रय कदम व जिल्हा समन्वयक श्री रविंद्र डोळस, जिल्हा समन्वयक श्री संजय पुनसकर, महिला लोकसभा संपर्क संघटक सौ नेहा माने, जिल्हा संघटक सौ वेदा फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना, महिला संघटक, युवासेना, शिवसहकार सेना पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, शहरप्रमुख व प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे ही विनंती.