Home रत्नागिरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात करण्यात येणार अंत्यसंस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात करण्यात येणार अंत्यसंस्कार

0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात करण्यात येणार अंत्यसंस्कार

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर–.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित अनंतराव पवार यांचे काल सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झाले होते. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. असे आदेश शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here