रत्नागिरीउशीरा का होईना मार्च अखेर हापुस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाला...

उशीरा का होईना मार्च अखेर हापुस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाला असला तरी दर मात्र खुपच चढे असल्याने आज तरी सामान्य माणसाला हापूस आंबा खरेदी करणे फारच कठीण असल्याचे दिसून येत आहे

उशीरा का होईना मार्च अखेर हापुस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाला असला तरी दर मात्र खुपच चढे असल्याने आज तरी सामान्य माणसाला हापूस आंबा खरेदी करणे फारच कठीण असल्याचे दिसून येत आहे.. दरवर्षी मार्च च्या पहिल्या आठवड्यात हापूस आंबा बाजारात दाखल होत असे‌.आणि गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर तर अधिक प्रमाणात हापूस आंब्याची आवक वाढलेली असते.परंतु यंदा मात्र हापूस आंबा उशिराने बाजारात दाखल झाला आहे..आज एक डझन हापूस आंबा दीड ते दोन हजार रुपये दराने विकला जात आहे.. दरम्यान पुढील काही दिवसात हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल आणि दर ही कमी होतील असे बोलले जात आहे.. विचित्र हवामान. वेगवान वारे आणि अधुनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे यंदा हापूस आंबा हंगाम अडचणीत सापडला असल्याची माहिती आंबा बागायतदारांनी दिली आहे..

Breaking News

लांजा मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव २८ मार्चपासून

लांजा मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव २८ मार्चपासून-- लांजा :...

रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक उत्साहात पडली पार

रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक उत्साहात पडली पार-- माजी...