रत्नागिरी, दि. 21 (जिमाका) : एक जिल्हा एक उत्पादनात देशात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरून हापूस आंब्याला सुवर्णपदकाचा मान मिळाला. हा मान मिळवून देण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी, हापूस विक्रेते संघानी प्रयत्न केले त्या सर्वांना प्रमाणपत्र देवून पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज गौरविले.
जिल्हा उद्योग केंद्राचे माजी महाव्यवस्थापक प्रकाश हणबर, सध्याचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, संकेत कदम, कोकण हापूस विक्रेते संघाचे मिलिंद जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, अमर देसाई, आनंद देसाई, श्रीकांत भिडे, विनोद हेगडे, शाहीद पिरजादे, अर्चना सकपाळ, आकाश म्हेत्रे, रविंद्र सूर्यवंशी, पूर्णांगी वायंगणकर, मुकुंद खांडेकर आदींना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी प्रमाणपत्र दिले. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनीही जिल्ह्याच्या या यशाबद्दल पालकमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सफाई कामगारांना नियुक्तीपत्र
लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेच्या सफाई कामगारांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते आज नियुक्तीपत्र देण्यात आले. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, छत्रपती संभाजीनगर खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार कायमस्वरुपी सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देणार रत्नागिरी जिल्हा पहिला आहे. यानुसार अन्य नगरपरिषदेनेही कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.
000
एक जिल्हा एक उत्पादनात रत्नागिरीच्या आंब्याला सुवर्णपदक ; अधिकारी, कोकण हापूस विक्रेते संघाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
