एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
रत्नागिरी, : एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, धनजीनाका, रत्नागिरी येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक, प्रखर राष्ट्रवादी आणि समाजजागृतीचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या प्रेरणादायी घोषणेचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला.
यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन करत देशप्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. नोमान नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकीब काझी तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व संस्कारांची जपणूक होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षकांनी केले.
