रत्नागिरीऐन निवडणुकीच्या हंगामातच मंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टाचा दणका

ऐन निवडणुकीच्या हंगामातच मंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टाचा दणका

मंत्री पद तर जाणार. आमदारकी ही रद्द होण्याची शक्यता? अटकेसाठी वॉरंट जारी; राजकीय घडामोडींना आला वेग!
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद पुन्हा धोक्यात आलं आहे. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होणार आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवली आहे.

माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे दोघांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. सध्या कोकाटे बंधू नॉट रिचेबल झाले आहे. त्यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

शासकीय कोट्यातली १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटे यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रथम वर्ग न्यायालयानं शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवत कोकाटे यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु झाल्या आहेत. न्यायालयाच्या निकालाची प्रत विधिमंडळाला मिळाल्यावर कोकाटे यांची आमदारकी रद्द होईल. कोकाटे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्यानं न्यायालयानं सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती मंत्र्‍यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. पण न्यायालयानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.या निकालाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.. हा निकाल म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फार मोठा दणका आणि धक्का असल्याचे बोलले जात आहे

Breaking News