राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते बशीर मुर्तुझा आणि युवक जिल्हाध्यक्ष नौसिन काझी यांनी रत्नागिरी नगर पालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे—
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे गेल्या अनेक वर्षांपासून अनाधिकृत पणे कचरा जाळला जात आहे आणि त्याचा लगत राहणाऱ्या कोकण नगर.स्टेट बँक कॉलनी क्रांतीनगर साळवी स्टॉप शिवाजीनगर चर्मालय आदी भागातील नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.. ही बाब खुपच गंभीर असतानाही रत्नागिरी नगर परिषद मात्र त्या कडे गांभीर्याने पाहत नसल्याने अखेर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते बशीर मुर्तुझा युवा नेते सईद पावस्कर.सनीफ गवाणकर आदी जण पुढे आले त्यांनी जनहितार्थ मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली आणि हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा नपेक्षा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा ही दिला आहे..