कर्तृत्व, नेतृत्व आणि जागतिक मुत्सद्देगिरीचा अजून एक नवा अध्याय..!
‘ऑपरेशन सिंदूर’ मधील धडाकेबाज कामगिरीनंतर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. भारताची ‘संसदीय मुत्सद्देगिरी’ (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर नेण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्थापन केलेल्या ‘पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्स’ (Parliamentary Friendship Groups) मध्ये खासदा शिंदे यांची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारीवर निवड झाली आहे.
- वयाने तरुण, पण मुत्सद्दी…!
संपूर्ण देशातील ६४ देशांच्या या गटात वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी ‘सर्वात तरुण शिष्टमंडळ प्रमुख’ (Youngest Leader of Delegation) म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे आता इंडोनेशिया या देशा सोबतच्या भारताच्या संबंधांचे नेतृत्व करतील. ही केवळ एका खासदाराची निवड नसून, महाराष्ट्राच्या युवा नेतृत्वावर दिल्लीने दाखवलेला हा एक मोठा विश्वास आहे.
- पक्षभेद विसरून भारताचा आवाज बुलंद!
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जिथे ८० वर्षीय पी. चिदंबरम (इटली) आणि शशी थरूर (फ्रान्स) सारखे अनुभवी नेते आहेत, तिथे डॉ. श्रीकांत शिंदे हे तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करत इंडोनेशिया शिष्टमंडळाचे सारथ्य करतील.
या उपक्रमातील इतर काही प्रमुख शिष्टमंडळे:
- डॉ. श्रीकांत शिंदे: प्रमुख – इंडोनेशिया 🇮🇩 (सर्वात तरुण प्रमुख)
- बैजयंत पांडा: प्रमुख – अमेरिका 🇺🇸
- अखिलेश यादव: प्रमुख – ऑस्ट्रेलिया 🇦🇺
- सुप्रिया सुळे: प्रमुख – सिंगापूर 🇸🇬
- रवीशंकर प्रसाद: प्रमुख – युनायटेड किंगडम 🇬🇧
- अभिषेक बॅनर्जी: प्रमुख – अल्जेरिया 🇩🇿
- का महत्त्वाचे आहे हे पद?
१. इंटर-पार्लमेंटरी एंगेजमेंट: दोन देशांमधील लोकशाही संबंध अधिक घट्ट करणे.
२. युथ लीडरशिप: जागतिक व्यासपीठावर भारताचे ‘तरुण राष्ट्र’ हे स्वरूप प्रभावीपणे मांडणे.
३. ऑपरेशन सिंदूरचा वारसा: लष्करी आणि सामरिक यशानंतर आता संवाद आणि मैत्रीच्या माध्यमातून भारताची प्रतिमा उंचावणे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि ओम बिर्लाजींच्या नेतृत्वाखाली, डॉ. श्रीकांत शिंदे साहेब इंडोनेशियासोबतचे द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेतील यात शंका नाही.
महाराष्ट्राच्या या ‘यंग डायनॅमिक’ नेत्याला या जागतिक जबाबदारीसाठी खूप खूप शुभेच्छा!
