रत्नागिरीकवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिन

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिन

रत्नागिरी,  (जिमाका) : 27 फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून मराठी भाषा विभाग, मराठी भाषा समिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजता मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी व मराठी भाषा समिती अध्यक्ष विश्वजीत गाताडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंड व सदस्य मराठी भाषा समिती गजानन पाटील, रत्नागिरी कोमसापचे अध्यक्ष आनंद शेलार, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे हे उपस्थित राहणार आहेत.

Breaking News

मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या सुशिक्षित वर्गावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; ‘नोटा’बाबतही नोंदवले महत्त्वाचे निरीक्षण

मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या सुशिक्षित वर्गावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; 'नोटा'बाबतही...

उत्कृष्ट लघु उद्योजकास जिल्हा पुरस्कार 2024-25 साठी 4 मार्चपूर्वी अर्ज करावेत

रत्नागिरी, (जिमाका):- जिल्ह्यातील स्थायीरित्या लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग...