रत्नागिरीकसबा, संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य-दिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी रुपये 300...

कसबा, संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य-दिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी रुपये 300 कोटींच्या आराखड्यास अर्थसंकल्प 2025-26 मध्ये मंजूरी व निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार शेखर निकम यांनी केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले कार्य, लढा, त्याग, शौर्य, पराक्रम अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. संभाजी महाराजांचा इतिहास फक्त संगमेश्वरचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि हिंदवी स्वराज्याचा अमूल्य वारसा आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय उपस्थित करून याविषयी संवाद साधला होता.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार Ajit Pawar व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री Uday Samant – उदय रविंद्र सामंत यांनी संबंधीत अधिकारी यांसह प्रत्यक्ष या स्थळाची पाहणी केली आहे. या ठिकाणी छात्रपती संभाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी स्वर्गीय अजितदादा पवार यांची इच्छा होती. त्याचप्रमाणे कोकणातील जनतेची आग्रही मागणी असल्याने छात्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून मंजूरी देण्याची निवेदनपर विनंती आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे

Breaking News

उपनगराध्यक्षांच्या शिवीगाळ प्रकरणी भाजप आक्रमक भूमिकेत. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन केले सादर

रत्नागिरी नगरपरिषदेत घडलेल्या उपनगराध्यक्षांच्या शिवीगाळ प्रकरणासंदर्भात आज भारतीय जनता...