रत्नागिरीकातकरी समाजातील पहिली महिला वकील सपना वाघमारे युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स लंडन येथे...

कातकरी समाजातील पहिली महिला वकील सपना वाघमारे युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स लंडन येथे एलएलएम साठी दाखल

कातकरी समाजातील पहिली महिला वकील सपना वाघमारे युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स लंडन येथे एलएलएम साठी दाखल.-.

कातकरी समाजातील पहिली वकील कु. सपना राजेश वाघमारे हिची ही यशोगाथा केवळ एका मुलीच्या कर्तृत्वाची कथा नाही, तर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी आहे.
रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील कोलाड , चिंचवली या छोट्याशा पाड्यातून सपना हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत श्रीगणेशा केला. वनवासी कल्याण आश्रम शाळा, उत्तेखोल (माणगाव) येथे राहून तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. संघर्ष, आर्थिक अडचणीवर मात करीत आणि सामाजिक संघर्ष करत तिने आज रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील पहिली महिला वकील होण्याचा मान मिळवला आहे. आता तीची ग्लोबल स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत तिची निवड University of Leeds आणि Queen Mary University of London येथे LLM शिक्षणासाठी झाली आहे.

वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी वनवासी समाजात शिक्षणातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न येथे अधोरेखित केले पाहिजेत . आई वडिलांचे छत्र हरपल्यावरही जिद्दीने तिने शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वास यांच्या माध्यमातून समाज उभा कसा करता येईल याचा विचार प्रामुख्याने केला .
समाजातील दुर्बल घटकांनी शिक्षित होऊन आत्मसन्मानाने उभे राहावे, हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते
आज वनवासी समाजातील अनेक मुली सपनाकडे पाहून स्वतःची स्वप्ने रंगवत आहेत. “आम्हीही कुठे कमी नाही,” हा आत्मविश्वास त्यांच्या डोळ्यांत तरळत आहे. सामाजिक समरसतेच्या भावनेतून, माणुसकीच्या आधारावर आणि शिक्षणाच्या शक्तीवर उभे राहिलेले हे परिवर्तन अधिक टिकाऊ आणि परिणामकारक आहे
आदिवासी समाजातील सपनाचा हा प्रेरणादायी प्रवास केवळ तिच्या कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट नाही तर संपूर्ण समाजासाठी आशास्पद आहे.
ॲड विलास पाटणे

Breaking News