राजकीयकुणकुण लागताच जिल्हाप्रमुख संजय कदम यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून करण्यात...

कुणकुण लागताच जिल्हाप्रमुख संजय कदम यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून करण्यात आली हकालपट्टी–

रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीचे (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार व उद्धव ठाकरे यांचे अगदी विश्वासु संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

गेले काही दिवस जिल्हाप्रमुख संजय कदम शिंदे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. याला त्यांच्याकडून अधिकृत दुजोरा आला नसला तरीही ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

ठाकरे पक्षात राहून त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.

Breaking News

अखेर देवरुख एस.टी. आगाराला ही मिळाल्या नवीन बसेस !

देवरुख :- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख एस.टी. आगारातील एस.टी.बस टंचाईचा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट–

गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त...