रत्नागिरीकुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेत दीप अमावस्ये च्या दिवशी रंगणार टिपऱ्या आणि भोवत्यांचा...

कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेत दीप अमावस्ये च्या दिवशी रंगणार टिपऱ्या आणि भोवत्यांचा कार्यक्रमकुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे यंदा दीप अमावस्ये च्या दिवशी

श्री यशवंत हरी गोखले सभा गृहात
श्रावण मासारंभ निमित्ताने टिपऱ्या आणि भोवत्यांचा कार्यक्रम दि. २४ जुलै रोजी संध्या. ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे, तसेच या वेळी विविध आणि आकर्षक दिव्यांची आरास देखील केली जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अश्या को का को ला ग्रुप लांजा यांच्या वतीने टिपऱ्या आणि भोवत्यांचे बहारदार नृत्य सादर करण्यात येणार असुन समस्त रत्नागिरी करांनी सदरचा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी, साळवी स्टॉप- नाचणे लिंक रोड , हवामान खात्या समोरील, श्री यशवंत हरी गोखले भवन येथे उपस्थित रहावे असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभे मार्फत करण्यात आले आहे.
कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे गोखले भवन नवीन सर्व सोयीनी युक्त सुसज्ज असे सभागृह आता तयार झाले असुन, याचा वापर नाचणे, काजरघाटी, मिरजोळे, कुवारबाव, खेडशी ,व सर्व रत्नागिरीकरांनी घ्यावा असे आवाहन
तसेच मुद्दाम हून बघण्या साठी निमंत्रित सभेमार्फत केले आहे

Breaking News