महाराष्ट्रकेंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार संविधानाची अनदेखी करणारे सरकार असल्याचा घनाघाती आरोप...

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार संविधानाची अनदेखी करणारे सरकार असल्याचा घनाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे

. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे दोन दिवशीय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत मागे काय झाले हे आता न पाहता आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपापसातील वाद-विवाद संपून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करावे असे आवाहन केले. यावेळी त्यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्य शासनाच्या कारभारावर घनाघाती आरोप करीत त्यांचा चांगला समाचार घेतला. याप्रसंगी आमदार भाई जगताप माजी आमदार हुसेन दलवाई माजी आमदार हुस्नबानु खलिफे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश किर आदी उपस्थित होते

Breaking News