रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तम व दर्जेदार क्रिकेटपटू तयार व्हावेत अशा एकमेव हेतूने व उद्देशाने रत्नागिरी येथील श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम वर कै. छोटू देसाई क्रिकेट ॲकॅडमीतर्फे शालेय मुला-मुलींसाठी दिनांक 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत हिवाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे .
प्रशिक्षण हे सर्व वयोगटातील मुला – मुलींसाठी असून सदरचे प्रशिक्षण शिबिर सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात चालू राहणार आहे . मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत प्रशिक्षक श्री . बावा चव्हाण, श्री. सुनील लिंगायत तसेच रत्नागिरीतील नामवंत क्रिकेटपटू श्री. राजू सावंत ,माजी रणजीपटू हरीश लाडे ,दिवाकर मयेकर अक्षय पाटील, विश्वनाथ लिंगायत व कु. दर्शना पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात क्रिकेटचे आधुनिक तंत्र शिकवण्यावर व फिटनेसवर भर दिला जाणार आहे व शिबिरांतर्गत सराव सामने घेण्यात येणार असून ज्यांना सदरच्या प्रशिक्षण शिबिरात भाग घ्यावयाचा आहे . त्यांनी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर उपस्थित रहावे अथवा ॲकॅडमीचे सचिव श्री. दीपक देसाई ( मो.नं.9890457978) यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन ॲकॅडमीचे अध्यक्ष पाथरे यांनी केले आहे .
