रत्नागिरीकोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून होणाऱ्या घोर अन्यायाविरोधात दिल्लीत आवाज

कोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून होणाऱ्या घोर अन्यायाविरोधात दिल्लीत आवाज

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेंबाबत मध्य रेल्वेकडून कोकणवासीयांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीविरोधात केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना एक सविस्तर पत्र सुपूर्द करून मध्य रेल्वेच्या ‘उत्तर भारत केंद्रित’ धोरणाबद्दल माझा तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, दादर रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आकडेवारीसह मध्य रेल्वेचा दुजाभाव उघड करताना त्यांच्या निदर्शनास खालील मुद्दे आणून दिले:

  • कोकणच्या वाट्याला केवळ ३६ गाड्या: मध्य रेल्वेने १९ मार्गांवरून अंदाजे १,५०० ‘समर स्पेशल’ गाड्यांचे नियोजन केले आहे. यापैकी तब्बल ४५० गाड्या बिहारसाठी, ३३२ गाड्या उत्तर प्रदेशसाठी सोडल्या. याउलट, मुंबईतून लाखो चाकरमानी ज्या कोकणात प्रवास करतात, त्या मार्गावर (मडगाव व्हाया कोकण) केवळ ३६ गाड्या सोडण्यात आल्य. हा अन्याय आहे
  • उत्तर भारतासाठी रोज, तर कोकणासाठी आठवड्यातून एकदाच: एप्रिल महिन्यात ‘सीएसएमटी-गोरखपूर’ विशेष गाडी दररोज धावणार आहे, तर ‘सीएसएमटी-मडगाव’ ही गाडी १६ एप्रिल ते ११ जून दरम्यान केवळ आठवड्यातून एकदा (गुरुवारी) धावणार आहे. हा विरोधाभास संतापजनक आहे.
  • नियमित गाड्या हाऊसफुल्ल: उन्हाळी सुट्ट्यांसाठी मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस इ. सारख्या नियमित गाड्यांच्या स्लीपर क्लासची ‘वेटिंग लिस्ट’ १०० च्या पुढे गेली आहे, याची जाणीव मंत्र्यांना करून दिली.

जनआंदोलनाचा इशारा:
सध्याचे रस्ते, घाटांचे अवघड मार्ग आणि वाहतूक कोंडी यामुळे रस्ते प्रवास सोयीचा व सुरक्षित राहिलेला नाही. अशा वेळी रेल्वेने कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे. मध्य रेल्वेच्या या उत्तर भारत-केंद्रित धोरणामुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप आहे. हा अन्याय तातडीने दूर न केल्यास कोकणातील जनतेचा उद्रेक होईल आणि आम्हाला तीव्र जनआंदोलन छेडावे लागेल.
माझ्या प्रमुख मागण्या:
कोकणवासीयांची गैरसोय आणि प्रवासी संख्या लक्षात घेऊन १. मध्य रेल्वेला तातडीने निर्देश देऊन कोकणाकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवून त्या ‘दररोज’ कराव्यात. २. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त रेक्स (Rakes/डबे) उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या केल्या आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या लढ्यात कोकणवासीयांसोबत ठामपणे उभा आहे.

-खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...