कोकणात पर्यायाने चिपळूण तालुक्यात आजतागायत हिंदु मुस्लीम सलोखा अबाधीत राहिला आहे.यापुढेही तो कायम राहावा,यासाठी येथील पोलीस यंत्रणा, प्रशासन,राजकीय पक्ष,सामाजिक संघटनांसह नागरिक प्रयत्नशील असतात.मात्र सध्या देशासह राज्यातील काही घटनांमुळे सामाजिक वातावरण काहीसे ढवळून निघाले आहे.तसेच राजापूर व दापोली येथील घटना काही दिवसांपूर्वी घडल्या आहेत.सध्या हिंदु समाजाचा शिमगोत्सव तर मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे.दि.३० मार्चला गुढीपाडवा तर दि.३१ मार्चला रमजान ईद साजरी होणार आहे. चिपळूण तालुक्यात हे दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचपार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी आपल्या दालनात शांतता कमिटीची बैठक घेतली.यावेळी गुढीपाडवा, रमजान ईद हे दोन्ही सण शांततेत पार पाडावेत.कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल,असे कोणतेही वर्तन करू नये,सोशल मीडियावर सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या अथवा धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करू नये,अफवा पसरवू नये,अफवांवर विश्वास ठेऊ नका,अशा सूचना केल्या.अशी व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशाराही यावेळी श्री.मेंगडे यांयांनी दिला.या बैठकीला शौकत मुकादम, प्रशांत यादव,नितीन उर्फ आबू ठसाळे, नाझीम अफवारे, सलीम पालोजी, इम्तियाज मुकादम, श्री.परकार,प्रकाश पवार,करामत मिठागरी आदी उपस्थित होते.
कोकणात पर्यायाने चिपळूण तालुक्यात आजतागायत हिंदु मुस्लीम सलोखा अबाधीत राहिला आहे.यापुढेही तो कायम राहावा,यासाठी येथील पोलीस यंत्रणा, प्रशासन,राजकीय पक्ष,सामाजिक संघटनांसह नागरिक प्रयत्नशील असतात
