रत्नागिरी – भाजपा नेते, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार श्री. निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रत्नागिरी जिल्ह्यातील ५८ शाळांना डिजिटल साहित्याचे वाटप करण्यात आले .
◼️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, खंडाळा वाटद, यांनीही शालेय संगणकासाठी, वर्षा राजे निंबाळकर यांच्या तर्फे निवेदन दिले होते, ते मंजूर होऊन त्यांना संगणक मिळाले ह्या बद्दल, वर्षा राजे निंबाळकर यांनी शाळेत भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका *श्रीमती. स्वाती बेंद्रे * यांनी समस्त शिक्षक वर्ग, पालक समिती, विद्यार्थी यांच्या तर्फे *आमदार श्री निरंजन जी डावखरे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
◼️”ह्या समाजाचे आपण सर्व जण देणे लागतो. उद्याची विकसित पिढी घडवण्यासाठी अशा प्रकारचे साहाय्य हे नेहमीच मोलाचे ठरते,” असे वर्षा राजे निंबाळकर म्हणाल्या. त्यांनीही आमदार निरंजन डावखरे तसेच त्यांच्या सौभग्यावती नीलिमा डावखरे मॅडम ह्यांचे ह्या सहाय्या बद्दल आभार मानले.
◼️हे निवेदन पूर्ण होण्यासाठी श्री. योगेश हळदवणेकर यांनीही त्यांचे योगदान दिले आहे. त्यांचेही मनापासून आभार मानण्यात आले.