शंभूराजे फ्रेंड्स सर्कल, कोल्हापूर आयोजित आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणवर २५-७, २५-१५ अशा सरळ दोन सेटमध्ये मात करून या गटाचे विजेतेपद पटकाविले.महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या मधुरा देवळेला २५-११, २५-१९ असे हरविले. विजेत्या पहिल्या आठ खेळाडूंना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव योगेश फणसळकर, कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशनचे सचिव विजय जाधव, छत्रपती शंभूराजे मंडळाचे मान्यवर पदाधिकारी व प्रमुख पंच सूर्यकांत पाटील उपस्थित होते.
महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे
आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) २१-१९, १२-२५, १९-१७
केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) वि वि मधुरा देवळे ( ठाणे ) १८-५, २१-२०
अरुण केदार
मानद सचिव
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन
सोबत : विजेते खेळाडू डावीकडून विकास धारिया, सागर वाघमारे, आकांक्षा कदम आणि केशर निर्गुण.
