रत्नागिरीखेड मधील एल.टी.टी. स्कुलची रत्नागिरी जिल्हास्तरीय कब-बुलबुल जिल्हा मेळाव्यात उत्तुंग कामगिरी

खेड मधील एल.टी.टी. स्कुलची रत्नागिरी जिल्हास्तरीय कब-बुलबुल जिल्हा मेळाव्यात उत्तुंग कामगिरी

खेड येथील एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूलच्या
स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी कब बुलबुल जिल्हा मेळावा 2025/26 चे शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी भारत स्काऊट्स अँड गाईड्स रत्नागिरी जिल्हा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रिगल काॅलेज चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या कब-बुलबुल जिल्हास्तरीय 2025/26 मेळाव्यात शाळेच्या कब म्हणून सहा मुले रुद्र संदीप कदम, रुद्र चव्हाण, रुदांत कावणकर, राधेय वडके, तन्मय काटकर, रुद्र कदम या 6 विद्यार्थ्यांनी आणि बुलबुल म्हणून आरुषी मोरे, ओवी जंगम, वेदा मोरे, अन्वी कांबळे, खुशी लाले,ओवी पांढरे, काव्यांजली कदम या 7 विद्यार्थींनीनी चांगल्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करून त्यामध्ये उत्तम यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेने मिळवलेली बक्षिसे त्यामध्ये शारीरिक प्रात्यक्षिके स्पर्धा मुली प्रथम क्रमांक, शारीरिक प्रात्यक्षिके स्पर्धा मुले प्रथम क्रमांक, बौद्धिक स्पर्धा मुले तृतीय क्रमांक, बौद्धिक स्पर्धा मुली तृतीय क्रमांक, सांस्कृतिक स्पर्धा या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक असे यश प्रदान करून अनेक बक्षिसे मिळवली. विद्यार्थ्यांच्या
या यशामुळे एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे स्काऊट गाईडचे मार्गदर्शक श्री. सुशांत पाटील, सौ.सारीका जाधव, व सौ. अरुणा दुधाळ यांचे मार्गदर्शन मिळाले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष.श्री अहमदभाई मुकादम, श्री.वाहीद मुकादम, श्री. जयेश गुहागरकर, श्री.माजिद खतीब, श्री. प्रेमल चिखले, श्री. चंद्रकिरण वैद्य, डॉ. पुष्कर नेने, श्री. विलीन पाटणे, समन्वयक. श्री. जॉय, मुख्याध्यापक. श्री सारंग जी.बी., प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सौ. एल्सी जॉय, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.कुडाळकर पी. एस. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करुन कौतुक केले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Breaking News