रत्नागिरीखेड मध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या दि. 20 मार्च रोजीच्याप्रकट दिन सोहोळ्याच्या...

खेड मध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या दि. 20 मार्च रोजीच्याप्रकट दिन सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर निघणा-या पालखी सोहळ्यात स्वामी भक्तांनी सहभागी  व्हावे

खेड मध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या दि. 20 मार्च रोजीच्या
प्रकट दिन सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर निघणा-या पालखी सोहळ्यात स्वामी भक्तांनी सहभागी  व्हावे–
खेड तालुक्यातील शिवतर रोड येथील भैरी भवानी मधील अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिर खेड येथे शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी होणा-या प्रकटदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाबरेबरच पालखी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी या वाजतगाजत, लेझीमच्या तालावर, चित्ररथ, उंट, हत्तींच्या सहभागाने मंगलमय आणि शांततेच्या वातावरणात निघणा-या न भरतो न भविष्य ती अशा पालखी सोहळ्यात सर्वच स्वामी भक्तांनी महिला स्वामी भक्तांनी भगवी साडी तर पुरुष भक्तांनी पांढरा झब्बा लेंगा असा पारंपरिक पद्धतीचा वेष परिधान करून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे.
शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी होणा-या श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाच्या पाश्र्वभूमीवर सकाळी 6.00 वाजता श्रींचे पुजन, सकाळी 7.00 वाजता श्रींचे जन्मोत्सव किर्तन, सकाळी 9.00 ते 12.00 वाजता लघुरुद्र, दुपारी 12.30 वाजता श्रींचा मुखवास, सायंकाळी 5.00 वाजता श्री स्वामी समर्थांच्या भैरी भवानी नगर येथील मंदिरापासून सवाद्य पालखी परिक्रमा सोहोळ्यास सुरुवात होऊन महात्मा फुले नगर मार्गे, – छत्रपती शिवाजी महाराज चौक, -वाणीपेठ, -गांधी चौक – पानगल्ली, -गुजरआळी,-पावसकर नाका, -सोनार आळी-बाजारपेठ-हनुमान पेठ-कोष्टी आळी, -संत रोहीदास नगर, – संतसेना नगर -योगायोग सोसायटी मार्गे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर भैरी भवानी नगर खेड येथील मंदिरात पालखी सोहळ्याची सांगता होईल त्यानंतर रात्री 9.00 भोजनाचा कार्यक्रम होईल. आणि श्री स्वामीना 2100 पुरण पोळींचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. तरी स्वामी भक्तांना पुर्ण पोळी द्यायची असेल त्यांनी मंदिरामध्ये सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत जमा कराव्यात अशी विनंती संयोजकांकडून करण्यात आली आहे. अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे श्री. संदीप सासने, श्री. दिवाकर नांदगावकर, श्री. गुणाजी खेडेकर, श्री वैभव जंगम, श्री. मंगेश पवार, श्री. बाळु वर्मा, श्री. उल्हास शेलार यांनी बोलावलेल्या प्रत्रकार परिषदेमध्ये दिली.

Breaking News

महिलांनी कायदेशीर हक्काबाबत जागरूक व्हावे-जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

महिलांनी कायदेशीर हक्काबाबत जागरूक व्हावे-जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसेरत्नागिरी,...

अदाणी स्मार्ट मीटर सक्तीविरोधात रत्नागिरी शहर काँग्रेस आक्रमक

अदाणी स्मार्ट मीटर सक्तीविरोधात रत्नागिरी शहर काँग्रेस आक्रमक महावितरण अधिकाऱ्यांना...