रत्नागिरीगणपती बाप्पा मोरया.पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात रत्नागिरी सह जिल्ह्यात सात...

गणपती बाप्पा मोरया.पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात रत्नागिरी सह जिल्ह्यात सात दिवशीय बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

27 ऑगस्ट रोजी वाजत गाजत रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे एक लाख 65 हजार घरगुती तर 26 ठिकाणी सार्वजनिक बाप्पांचे आगमन झाले होते.

सात दिवस मनोभावे सेवेनंतर मंगळवारी जवळपास 1 लाख घरगुती तर 16 सार्वजनिक गणपतीचे समुद्र आणि नद्यांमध्ये विसर्जन करण्यात आले.. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी बाप्पाला निरोप देण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती

Breaking News