रत्नागिरीगोळप (पावस) पुलाजवळ तातडीने गतिरोधक उभारण्याची नागरिकांची मागणी

गोळप (पावस) पुलाजवळ तातडीने गतिरोधक उभारण्याची नागरिकांची मागणी

गोळप (पावस) पुलाजवळ तातडीने गतिरोधक उभारण्याची नागरिकांची मागणी!

रत्नागिरीकडे जाणाऱ्या पावस एसटी स्थानकाकडून बायपास मार्गे येताना गोळप पुलाजवळ वाहने अतिवेगाने धावत असल्याने या परिसरात अपघातांचा धोका वाढला आहे. तसेच गोळप पुलावरून गोळप मोहल्ल्याकडे जाणारा अंतर्गत रस्ता असून, रत्नागिरीकडून येणारी वाहनेही मोठ्या वेगाने येत असल्यामुळे हा परिसर अपघातप्रवण ठरत आहे. येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर, भविष्यात मोठे अपघात टाळण्यासाठी पावस बायपास रस्त्यावरून गोळप पुलावर उतरण्यापूर्वी तातडीने गतिरोधक उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी गोळप, पावस तसेच परिसरातील गावांतील नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...