मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; स्वस्तात प्रवास,बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची परवानगी–
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. सोलो प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टॅक्सीचं प्रवास भाडं परवडत नाही, यामुळे मुंबईत बाईक टॅक्सीची सुरुवात करावी, अशी मागणी मुंबईकर करत होते.
अनेक दिवसांपासून रखडलेल्या या निर्णयाबाबत आता अखेर मुंबईत बाईक टॅक्सीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयानं परवानगी दिली आहे. ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाहतूक कोंडीवर विविध उपाय करण्यात येत आहे. कोस्टल रोड असो वा, जलमार्ग वाहतूक असो, मेट्रो अथवा भुयारी रेल्वेचा टप्पा असो, मुंबई थांबता कामा नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच आता बाईक टॅक्सीचा नवीन मार्ग समोर आला आहे.
बाईक टॅक्सीसाठी नियमावली
– एका किलोमीटरसाठी तीन रुपये भाडे दर
– जसे ओला, उबर साठी जीपीएस यंत्रणा आवश्यक तसे बाईक टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक
– पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे.
– बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीकडे कमीत कमी ५० दुचाकी वाहने असणं आवश्यक
– नोंदणी क्रमाकांची (नंबर प्लेट) पाटी पिवळ्या रंगाची असेल. (Public Transport)
– दुचाकीसाठी विशिष्ट रंग ठरवण्यात येईल.
– बाईक टॅक्सी चालकाला बॅचची सक्ती असेल. हा बॅच परिवहन विभाग नोंदणी करून देईल.
– पोलीस पडताळणी करूनच चालक परवाना बॅच मिळणार आहे
– महिलांसाठी खास महिला बाईक रायडर असावेत, अशी सूचना संबंधित बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीस देण्यात येतील.