रत्नागिरीग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे रक्त साठवण केंद्राला अधिकृत मान्यता

ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे रक्त साठवण केंद्राला अधिकृत मान्यता

आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश
राजापूरकरांसाठी आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल
आमदार किरण सामंत यांच्या कार्याचा ठसा पुन्हा अधोरेखित–
👉राजापूर तालुक्यासाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणारी बातमी समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे प्रस्तावित रक्त साठवण केंद्राला अखेर शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे.
या महत्त्वपूर्ण मान्यतेमुळे आता राजापूर तालुक्यातील अपघातग्रस्त रुग्ण, गर्भवती माता तसेच तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होणार असून, जीव वाचवण्यासाठी कोकणाबाहेर धावपळ करण्याची गरज राहणार नाही.
या रक्त साठवण केंद्रासाठी आमदार किरण सामंत यांनी आरोग्य विभाग व शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, राजापूर तालुक्याच्या आरोग्य सेवेत हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.
यापूर्वी या भागातील रुग्णांना रक्तासाठी प्रामुख्याने रत्नागिरी किंवा इतर शहरांतील रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. आता स्थानिक पातळीवरच रक्त साठा उपलब्ध झाल्याने उपचार प्रक्रिया अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
स्थानिक नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, ग्रामीण भागातील आरोग्यसेवा मजबूत करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी दिला मोर्चाचा इशारा

👉 सालाबादप्रमाणे यंदाही रत्नागिरी जिल्ह्यात आंबा उत्पादनाचे प्रमाण अतिशय...

संपर्क युनिक फाउंडेशन च्या सामाजिक कार्याचे होत आहे सर्वत्र कौतुक

संपर्क युनिक फाउंडेशन च्या सामाजिक कार्याचे होत आहे सर्वत्र...