चिपळूणच्या गोवळकोट गावाशी नाळ जोडलेली, कॅप्टन खालिद अब्दुल वहाब मुकादम यांची कन्या फातिमा खालिद मुकादम हिने आज Qatar Senior Women’s Cricket Team साठी पदार्पणाचा सामना खेळत इतिहास रचला. मध्यमगती गोलंदाज आणि मधल्या फळीत फलंदाजी करणारी फातिमा केवळ १५ वर्षांची असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने चिपळूणचे नाव उज्वल केले आहे.वडिलांचे मूळ गाव गोवळकोट, चिपळूण असल्याने हा यशस्वी क्षण केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण चिपळूण शहरासाठी अभिमानास्पद ठरतो. लहान वयात मिळवलेले हे मोठे यश भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीचे संकेत देणारे आहे.फातिमाच्या या यशाबद्दल चिपळूणमधील सर्व स्तरातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
