रत्नागिरीचिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा दिला राजीनामा

चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा दिला राजीनामा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश-? 👉 चिपळूणचे माजी आमदार व माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वासह प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
राजीनाम्या बाबत प्रतिक्रिया देताना कदम यांनी पक्षातील अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. नगराध्यक्ष पदासाठी स्वतः पुढाकार घेऊन उमेदवारी करत आघाडीतील घटक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रयत्नांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ नेतृत्वाकडून पाठिंबा न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

“मी १९८४ पासून शरद पवार साहेबांसोबत काम करत आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पहिल्या दिवसापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. मंडळ स्तरापासून ते राजापूरपर्यंत पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पक्षासाठी आवश्यक ते सर्व काही केले, मात्र आज कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांना पक्षात कोणतीही किंमत उरलेली नाही,” असे कदम यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर पक्षात काम करण्याची इच्छा राहिलेली नसल्याचे नमूद करत रमेशभाई कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा केली आहे.. दरम्यान पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी रमेश कदम यांची भेट घेत त्यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे.. त्यामुळे रमेश कदम शिवसेनेत जातात कि भाजप मध्ये या कडे चिपळूण सह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे

Breaking News

सावर्डे विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उत्साहात प्रारंभ

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक...

अली पब्लिक स्कूल सावर्डे येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेत उज्वल यश

सावर्डे -राज्य शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय एलिमेंटरी व इंटरमिजिट चित्रकला...