चिपळूणचिपळूणातील वहाळ जिल्हापरिषद गटात उबाठाला खिंडार;प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत दाखल

चिपळूणातील वहाळ जिल्हापरिषद गटात उबाठाला खिंडार;प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत दाखल

चिपळूण:- तालुक्यातील वहाळ जिल्हापरिषद गटात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला जबरदस्त असे खिंडार पडले असून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट एकनाथजी शिंदे साहेब व पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.वहाळ जिल्हापरिषद गटात आमदार भास्कर जाधव यांचे एकहाती वर्चस्व असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका उबाठाला मोठा धक्का देणारी ठरली आहे.या निमित्ताने संदीप सावंत यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे नंतर वहाळ जिल्हापरिषद गट हा राजकीय प्रतिष्ठेचा मानला जातो.हा जिल्हापरिषद गट गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असल्याने सहाजिकच या गटाला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.तसेच सावर्डे,कोकरे हे जिल्हापरिषद गट वहाळ गटाला जोडून आहेत,त्यामुळे आजूबाजूला त्याचे राजकीय पडसाद उमटत असतात.त्यामुळे वहाळ जिल्हापरिषद गट हा नेहमीच चर्चेत राहिला असून आमदार भास्करशेठ जाधव यांचा हा गड समजला जातो.पण यावेळी संदीप सावंत यांनी त्या गटालाच पोखरले असल्याचे समोर आले आहे.
संदीप सावंत हे थेट सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात असलेले नेतृत्व असून त्यांनी नुकतेच पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, माजी आमदार सुभाषजी बने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथजी शिंदे साहेब यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला होता.तेव्हा पासूनच त्यांनी पक्षासाठी अहोरात्र काम करण्यास सुरुवात केली होती.आता तर त्यांनी उबाठाचे प्रमुख मोहरे टिपले असून वहाळ जिल्हापरिषद गटात आम.जाधव यांना जोरदार दणका दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आले होते,त्यावेळी वहाळ गटातील उबाठाचे कळंबट शाखाप्रमुख बाबुराव घाणेकर, मुर्तवडे शाखाप्रमुख अशोक पांचाळ, कळंबट-घवाळगाव शाखाप्रमुख संदीप निर्मळ, तोंडली शाखाप्रमुख दिलीप कांबळे, वीर शाखाप्रमुख अंकुश घेवडे, कळंबट उपशाखाप्रमुख महेश पिलवलकर, मुर्तवडे उपशाखाप्रमुख दीपक पांचाळ, कळंबट केंद्रप्रमुख महेश काटदरे, कळंबट बूथप्रमुख विश्वनाथ शिरकर, वीर बुथप्रमुख पांडुरंग दुर्गुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,पालकमंत्री उदयजी सामंत साहेब,राज्याचे गृहमंत्री योगेशजी कदम साहेब,माजी आमदार सुभाषजी बने साहेब,माजी आमदार राजनजी साळवी साहेब ,उपनेते संजयजी कदम साहेब ,राजेंद्रजी महाडिक, जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण तसेच संदीप सावंत यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून पक्षासाठी कामाला लागण्याचे सूचना दिले. या पक्षप्रवेशासाठी संदीप सावंत यांनी केलेल्या प्रयत्नांचे देखील नेत्यांनी तोंडभरून कौतुक केले.एका विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातील पदाधिकारी आमदारांची साथ सोडून शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत,ही संदीप सावंत यांच्या कामाची पोचपावती असल्याचे यावेळी पालकमंत्री उदयजी सामंत साहेब म्हणाले.
‌ वहाळ जिल्हापरिषद गटात हुकूमशाही सुरू होती.कामे कराची नाहीत आणि फक्त दादागिरी करून लोकांना दबावाखाली ठेवायचे हे धंदे येथे सुरू होते.मी नेहमीच सर्वसामान्य,कष्टकरी शेतकरी व गोरगरिबांच्या बरोबर राहिलो.त्यांच्या अडीअडचणीला,सुखदुःखात पाठी उभा राहिलो,म्हणून त्यांचा विश्वास माझ्यावर आहे.आता ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे,त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे.त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही.आणि यापुढे थांबणार देखील नाही.जे येतील त्यांना बरोबर घेऊन,जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय वहाळ जिल्हापरिषद गटावर भगवा फडकवणार असा ठाम विश्वास संदीप सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...