चिपळूणचिपळूण तालुक्यात तळसर केंद्रस्तरीय हिंवाळी क्रीडा स्पर्धेत पिंपळी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेले...

चिपळूण तालुक्यात तळसर केंद्रस्तरीय हिंवाळी क्रीडा स्पर्धेत पिंपळी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेले घवघवीत यश.

चिपळूण – तालुक्यातील तळसर केंद्र स्तरीय हिंवाळी क्रीडा स्पर्धेत पिंपळी उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांघिक तसेच वैयक्तिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करून अनेक चषकां वर आपले नांव कोरले.
या हिंवाळी क्रिडा स्पर्धेत तळसर केंद्रातील आठ शाळांनी सहभाग घेतला . स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. केंद्रीय प्रमुख वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत खेळाडूवृत्तीचे उत्तम उदाहरण दाखविले. या स्पर्धेत वैयक्तिक तसेच सांघिक खेळात पिंपळी उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी नैपुण्य यश प्राप्त केले.
वैयक्तिक स्पर्धेत सआद बोदले , साजिद लोणे ,शिफा मिराखान , तस्लिमा देवळेकर , रईस लांजेकर , हिना बावडेकर तसेच सांघिक खेळात कबड्डी आणि खो – खो मध्ये लहान मोठ्या गटात मुलगे आणि मुलींनी उसका वर नांव कोरले . विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक शराफत फकीर , आस्माॅ मोमीन , समीना खान तसेच नसिरुद्दीन शाह आदी शिक्षकांचे भरपूर मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्रक आणि शैक्षणिक साहित्य पिंपळी बुद्रुक च्या शिक्षण प्रेमी सरपंच स्मिता राजवीर तसेच तळसर केंद्राचे केंद्रीय प्रमुख वैशाली जाधव यांच्या हस्ते चषक देण्यात आले. या वेळी पिंपळी उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी खूप आनंद व्यक्त केला . पिंपळी उर्दू शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या.

Breaking News