चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आज शिवसेना उपनेते, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी चिपळूण येथे अतिथी सभागृहात आयोजित विजयोत्सव सोहळ्यात चिपळूण व गुहागर नगरपरिषदेत विजयी झालेल्या उमेदवारांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देत संवाद साधला.
यावेळी रोहयो मंत्री ना.भरतशेठ गोगावले, माजी आमदार श्री.सदानंद चव्हाण, माजी आमदार श्री.संजय कदम, गुहागरचे श्री.राजेशजी बेंडल, जिल्हाप्रमुख श्री.शशिकांत चव्हाण, जिल्हाप्रमुख श्री.राहुलजी पंडीत, भाजपाचे प्रभारी नेते श्री.प्रशांतजी यादव आदी उपस्थित होते. यावेळी चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी विजयी झालेले श्री.उमेश सपकाळ, नवनियुक्त नगरसेवक श्री.उदय जुवळे, श्रीमती रुपाली दांडेकर, श्री.प्रमोद बुरटे, श्री.निहार कोवळे, श्रीमती वैशाली निमकर, श्री.संदीप भिसे, श्रीमती हर्षाली पवार, श्रीमती अंजली कदम, श्री.शशिकांत मोदी, श्रीमती रसिका देवळेकर, श्री.विक्रांत शिर्के, श्रीमती निलम जाधव, श्री.अंकुश आवळे, श्री.शुभम पिसे, श्री.गणेश आंग्रे, श्रीमती पल्लवी महाडिक यांचा सन्मान करुन विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
