चिपळूणचिपळूण येथील मुस्लिम दांपत्याने केले हिंदू मुलीचे कन्यादान---

चिपळूण येथील मुस्लिम दांपत्याने केले हिंदू मुलीचे कन्यादान—

चिपळूण येथे पार पडला आदर्श विवाह सोहळा

सध्या भारतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडवण्याचे काम काही जण करीत आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मध्ये एका आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चिपळूण शहरातील गोवळकोट येथे राहणाऱ्या इम्रान सय्यद यांनी स्वतःच्या घरी कामाला असलेल्या हिंदू मुलीचे लग्न प्रतिभा उर्फ सोना हिचे हिंदू संस्कृती प्रमाणे स्वखर्चाने लावून दिले. लहानपणापासून आई-वडील नसलेली प्रतिभा, इम्रान सय्यद याच्या घरी राहायला होती. घर काम करता करता ती इम्रानच्या घरातली एक सदस्य बनली. सोळा वर्ष स्वतःच्या घरी राहिलेल्या या बहिणी समान मुलीचा विवाह हिंदू संस्कृती प्रमाणे त्याने लावून दिला. तिच्यासाठी अनुकूल वर शोधून त्याची घरची परिस्थिती तपासून हा विवाह ठरला. इमरान सय्यद याचे संपूर्ण कुटुंब या विवाह सोहळ्यात सामील झाले. इतकेच नव्हे तर लग्नासाठी लागणारे दागिने, आहेर, संसार उपयोगी भांडी, अशा अनेक गोष्टी भेट देऊन त्यांनी एक प्रकारे कर्तव्य पार पाडले. गोवळकोट मधील राहणाऱ्या या तरुणाने एक वेगळा आदर्श घडवून दिला. इम्रान सय्यद या दांपत्याने या मुलीचे कन्यादान केले. तसेच लग्नाचा संपूर्ण खर्च इमरानने केला.
इम्रान सय्यद यांच्या या महान कार्याची अनेकांनी दखल घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

Breaking News

🌾गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलीजगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांची भेट

▪️देहदान उपक्रमाचे केले कौतुक पणजी, दि. १२: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ....

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 14/06/2025

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक - 14/06/2025 १) मंडणगड -31.75 मिमी२) खेड...