चिपळूणचिपळूण शहरातील भर बाजार पेठेतील एक सुपर मार्केट अज्ञात चोरट्यांनी फोडून पोलिसांची...

चिपळूण शहरातील भर बाजार पेठेतील एक सुपर मार्केट अज्ञात चोरट्यांनी फोडून पोलिसांची झोप उडविली आहे.

बाजारपेठेतील शहर पोलिस चौकीच्या लगतच असलेल्या या सुपर मार्केटमध्ये चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोरी करून सुपर मार्केट मधील किंमती सामान व खाद्यपदार्थांसह गल्ल्यातील रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे.

सुपर मार्केटमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे दोन अज्ञात चोरटे चोरी करताना टिपले गेले आहेत. हे सुपर मार्केट चिपळूण शहर पोलिस चौकीला लागूनच असून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत वर्दळ असते. सुपर मार्केटबरोबरच शहरातील सर्वात जुनी केशव आप्पाजी ओक यांची पेढीदेखील चोरट्यांनी फोडली. मात्र, यामध्ये चोरट्यांच्या हाती रोख रक्कम लागली नाही. परंतु सुपर मार्केटमधील खाद्यपदार्थ व गल्ल्यातील काही रोख रक्कमेवर डल्ला मारून चोरटे पसार झाले. त्यामुळे चिपळुणात एक मोठी पेढी व रस्त्यानजिकचे सुपर मार्केट फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलं आहे…

Breaking News

अली पब्लिक स्कूल सावर्डे येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेत उज्वल यश

सावर्डे -राज्य शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय एलिमेंटरी व इंटरमिजिट चित्रकला...

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...