चिपळूणचिपळूण : सुप्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे आज चिपळूण...

चिपळूण : सुप्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे आज चिपळूण दौऱ्यावर होते.

दरम्यान प्रांतधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी अनासपुरे यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे स्वागत केले. तसेच चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी नाम फाउंडेशन देत असलेल्या योगदानाबद्दल प्रशांत यादव यांनी आभार मानले. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शिवसेना (उबाठा) उपतालुकाप्रमुख बळीराम गुजर, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले उपस्थित होते. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याकरिता पावले उचलल्याबद्दल प्रशांत यादव यांनी प्रांतधिकारी आकाश लिगाडे आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...