रत्नागिरीजयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात -  मत्स्यव्यवसाय व बंदरे...

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात –  मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ७ :- रत्नागिरी जिल्ह्यातील
जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू निर्यात संदर्भातील आढावा बैठकीत दिल्या.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपकुमार यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात झाल्यास त्याचा काजू उत्पादकांना फायदा होईल. या बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तातडीने मिळाव्यात यासाठीही संबंधित विभागाने कार्यवाही करावी. या आढावा बैठकीत पणन मंडळ, स्मार्ट व मॅग्नेट, एफएसएसआय, रेल्वे या विभागाकडील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
००००००

Breaking News

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद-- अमरावती, मेळघाट संघर्ष यात्रेच्या...

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...