जागतिक डॉक्टर दिनानिमित्त सती चिंचघरी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची दवाखान्याला भेट

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त सती चिंचघरी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची दवाखान्याला भेट

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त सती चिंचघरी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची दवाखान्याला भेट

सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) हे उपक्रमशील विद्यालय आहे. गुणवत्तेसोबत प्रत्येक गोष्टीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभुती देण्याचा प्रयत्न असतो. जागतिक डॉक्टर दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या संकल्पनेतून सती येथील डॉक्टर अतुल दाभोळे यांच्या दवाखान्याला भेट देवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . डॉ दाभोळे यांनीही विद्यार्थ्याशी संवाद साधत दवाखान्यातील उपकरणे, विविध औषधे, उपचार पध्दती ,आपले आरोग्य व विद्यार्थ्यानी घ्यावयाची काळजी , आहार , स्वच्छता, नियमित व्यायाम या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले .यावेळी डॉक्टर दिनानिमित्त डॉ. अतुल दाभोळे यांचा भेटवस्तू व पुष्प देवून शाळेचे शिक्षक श्री. संदेश सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसमवेत सत्कार करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी खाऊ दिला. शाळेचे शिक्षक संदेश सावंत ,अपूर्वा शिंदे, वृषाली राणे, रूपाली खरात, ज्योती चाळके, शितल पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे विशेष नियोजन केले होते.

Breaking News

रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला गती

रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला गती ! भारतीय तटरक्षक दल आणि...

समाधान समारोह अंतर्गत विशेष लोकअदालतीचे आयोजन; ३१ जुलैपर्यंत प्रकरणांची नोंदणी करण्याची मुदत

समाधान समारोह अंतर्गत विशेष लोकअदालतीचे आयोजन; ३१ जुलैपर्यंत प्रकरणांची...