रत्नागिरीजिनिअस इन्स्टिट्यूट रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरीमधील हॉटेल लँडमार्क येथील सभागृहात आयोजित विद्यार्थी...

जिनिअस इन्स्टिट्यूट रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरीमधील हॉटेल लँडमार्क येथील सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात करिअर निवडीचे महत्व आणि करिअरच्या वाटा या विषयांवर व्याख्याते श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर

जिनिअस इन्स्टिट्यूट रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरीमधील हॉटेल लँडमार्क येथील सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात करिअर निवडीचे महत्व आणि करिअरच्या वाटा या विषयांवर व्याख्याते श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर

यावेळी विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी करिअरची निवड करणे आवश्यक असून, त्यासाठी वेळेचे व अभ्यासाचे नियोजन होणे आवश्यक आहे. करिअर निवड न करता आपण अभ्यास करणे हे करिअरच्या यशप्राप्तीतील मोठा अडथळा ठरू शकतो. त्यामुळे ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्याची आपल्या क्षमतेनुसार निवड करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच करिअर निवडताना आपली आवड, आपल्या क्षमता आणि साधनांची उपलब्धता या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत मांडून, करिअर कुणीतरी केले म्हणून आपणही तसेच केले पाहिजे हा अट्टाहास पालकांनी न धरता, आपल्या पाल्याची आवड जोपासली पाहिजे. करिअरचे लक्ष विद्यार्थ्यांना गाठायचे असते, त्यामुळे पालकांनी या गोष्टीची जाणीव ठेवून आदर्श पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच आपल्या पाल्यांशी सतत संवाद साधला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनीदेखील आपल्या पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झोकून देण्याचे आवाहन केले.

🙏🏻 या कार्यक्रमाला जिनियस इन्स्टिट्यूटचे संस्थापक मा. अजित पालकर सर, यांच्यासह प्राध्यापक, पालक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...