रत्नागिरीजिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डींग स्पर्धेचे ३० रोजी चिपळूण येथे आयोजन

जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डींग स्पर्धेचे ३० रोजी चिपळूण येथे आयोजन

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने काविळतळी, चिपळूण येथे जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डींग स्पर्धेचे ३० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.

आदर्श क्रिडा सामाजिक प्रबोधिनी चिपळूणचे अध्यक्ष सचिन उर्फ भैया कदम पुरस्कृत या स्पर्धेला ५१,००० हजारांचे रोख पारीतोषिक जाहिर करण्यात आले आहे.वाशिष्ठी सोसायटी काविळतळी बांदल हायस्कुल चिपळूण येथे ३० जानेवारी रोजी ५.०० वाजल्यापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी श्री, रत्नागिरी उदय, रत्नागिरी कुमार, रत्नागिरी श्रीमान, मेन्स् फिजीक अशा वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी कै.गिरीधर सिताराम मांजरेकर स्मृती प्रथम क्रमांक रोख रू.३१०००/- व आकर्षक चषक,कै.सदुभाऊ पाटणकर स्मृती द्वितीय क्रमांक रोख रू.२१०००/- अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील १ ते ३ क्रमांकांना कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड करणेत येणार आहे. उंची गटातील रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेशी संलग्न सर्व स्पर्धकांनीच सहभाग घेण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

उंची मापनासाठी व कागदपत्र छाननीसाठी फोटो, आवश्यक कागदपत्रांसह स्पर्धकांनी दुपारी ३.०० वाजता स्पर्धेच्या ठिकाणी हजर राहणेचे आहे. प्रत्येक किताब विजेत्यास मानाचा पट्टा व चषक देण्यात येईल. वरील स्पर्धेसाठी सदानंद जोशी मो. ९४२२३७२२९६, शैलेश जाधव मो. ९४२२४६८६१०, सचिन उर्फ भैया कदम चिपळूण मो. ९३२२९३१७५५ यांना संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

Breaking News