रत्नागिरी, : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हयातील ९ पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान केंद्र असणा-या मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या पंचायत समिती हद्दीतील शाळेतील मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी पोहोचणार आहेत. त्यामुळे ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान केंद्र असणा-या पंचायत समिती मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर क्षेत्रातील शाळांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या नऊ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक क्षेत्रामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
