👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये मोठे फेरबदल जाहीर केले आहेत.
या निर्णयानुसार जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. या नियुक्त्यांवर द्रौपदी मुर्मी यांनी शिक्कामोर्तब केले असून, लवकरच नव्या राज्यपालांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.
त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आणि सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहणारे जिष्णू देव वर्मा आता महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांची ओळख एक अनुभवी आणि अभ्यासू राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून आहे.महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत त्यांच्या अनुभवाचा राज्याला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देशभरातील महत्त्वाच्या राज्यपाल नियुक्त्या खालील प्रमाणे आहेत
महाराष्ट्र :- जिष्णू देव वर्मा (तेलंगणाहून बदली) दिल्ली (उपराज्यपाल) :- तरणजित सिंग संधू (माजी राजदूत)लडाख (उपराज्यपाल) :- व्ही.के. सक्सेना (दिल्लीहून बदली) बिहार :- सईद अता हुसैन पश्चिम बंगाल :- आर.एन. रवी (तमिळनाडू हून बदली) तेलंगणा :- शिव प्रताप शुक्ल (हिमाचल प्रदेशहून बदली)हिमाचल प्रदेश :- कविंद्र गुप्ता (लडाखच्या उपराज्यपाल पदावरून बढती) नागालँड :- नंदकिशोर यादव तमिळनाडू :- राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (केरळचे राज्यपाल असूनही अतिरिक्त कार्यभार)या फेरबदलामुळे देशातील विविध राज्यांमध्ये प्रशासनिक आणि राजकीय नेतृत्वात नवे बदल दिसून येणार आहेत. लवकरच सर्व नियुक्त व्यक्तींचा अधिकृत शपथविधी पार पडणार आहे.
