रत्नागिरीजि.प.रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांची नासच्या केनेडी स्पेस सेंटरला भेट:

जि.प.रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांची नासच्या केनेडी स्पेस सेंटरला भेट:

जि.प.रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांची नासच्या केनेडी स्पेस सेंटरला भेट: अंतराळ संशोधनाचा थक्क करणारा प्रवास जवळून अनुभवला 🚀🛰️💫

विद्यार्थ्यांनी फ्लोरिडामधील ऑरलॅंडो जवळ असलेल्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटरला शैक्षणिक भेट दिली. ही भेट केवळ शिक्षणापुरती नव्हे, तर अंतराळाच्या अद्भुत जगाची थेट अनुभूती देणारी ठरली.

भेटीची सुरुवात Gateway: The Deep Space Launch Complex या विभागापासून झाली. येथे नासाच्या आर्टेमिस मिशनसह भविष्यातील विविध मोहिमांची माहिती दिली जाते.
विद्यार्थ्यांनी येथे चार भव्य deep space travel simulators चा थरार अनुभवला. या सिम्युलेटर्सद्वारे त्यांनी विविध ग्रहांवरील अंतराळ प्रवासाचा अनुभव घेतला:

  1. Cosmic Wonders – अंतराळातील दृश्ये आणि तारे-ग्रह यांचे दर्शन.
  2. Red Planet – मंगळ ग्रहावर उतरल्यासारखा अनुभव
  3. Daring Explorers – मानवाच्या अंतराळातील
    मोहिमांची झलक.
  4. Uncharted Worlds – भविष्यातील अंतराळ प्रवास आणि नव्या शोधांची काल्पनिक सफर सफर.

यानंतर विद्यार्थ्यांनी IMAX थिएटरमध्ये NASA च्या अंतराळ रॉकेट प्रोग्रॅम्सवर आधारित चित्रपट पाहिला. या चित्रपटात Apollo, Saturn V, Artemis व SLS (Space Launch System) यांसारख्या मिशनचे प्रभावशाली सादरीकरण करण्यात आले होते. विद्यार्थी अंतराळ संशोधनामागील विज्ञान आणि प्रचंड प्रयत्न पाहून भारावून गेले.

भेटीच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मुख्य आकर्षण असलेल्या Space Shuttle Atlantis विभागाला भेट दिली. येथे प्रत्यक्षात वापरलेली आणि आता प्रदर्शनासाठी ठेवलेली Atlantis शटल पाहण्याची संधी मिळाली.

प्रमुख आकर्षणे:
• Shuttle Launch Experience – विद्यार्थ्यांनी अटलांटिस शटलचे प्रक्षेपण स्वतः या मोहिमेचा भाग असल्यासारखेअनुभव घेतले. अटलांटिसकशाप्रकारे कार्य करतं, उड्डाण कसे होते, पुन्हा पृथीवर कसे येते याचा अनुभव स्टिम्युलेटर्स द्वारे घेतला.
• Hubble Space Telescope Gallery – हबल दुर्बिणीच्या शोधाची व वैज्ञानिक महत्त्वाची माहिती.

ही शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरली. त्यांनी केवळ NASA च्या ऐतिहासिक आणि आधुनिक मोहिमांची माहिती घेतली नाही, तर प्रत्यक्ष अनुभव वअवकाश शास्त्राविषयी अगदी जवळून माहिती घेतली. ही भेट त्यांच्या मनात विज्ञानाविषयी अधिक कुतूहल निर्माण करणारी ठरली.

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...