जि.प.सदस्या शिवानी संदीप सावंत यांच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे,रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात
चिपळूण- तालुक्यातील सावर्डे,अबीटगाव,वहाळ या रस्त्यांची कामे मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण असताना देखील काम सुरू होत नसल्याने जिल्हापरिषद सदस्या सौ.शिवानी संदीप सावंत यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताना पत्र देऊन तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली.या एकाच पत्राने प्रशासन अक्षरशः खडबडून जागे झाले आणि अवघ्या २४ तासात रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली.सौ.सावंत यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन दर्जेदार काम करण्याच्या सूचना सबधितांना दिले आहेत.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे,अबीटगाव मूर्तवडे तवसाळ, तसेच सावर्डे,वारेली, तोंडली पिलवली आणि वहाळ, शिरंबे विरबंदर या रस्त्यांची कामे शासनाच्या नॉन प्लॅन,एमसी अंतर्गत मंजूर झाली आहेत.या कामांची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे.परंतु गेली कित्येक महिने या कामांना सुरुवात झालेली नव्हती.सद्यपरिस्थितीत या रस्त्यांची अवस्था अत्यंत दैनिय झाली असून वाहतूक करणे अवघड बनले आहे.ग्रामीण भागातील हे महत्वाचे रस्ते असून दळणवळणासाठी हा प्रमुख मार्ग आहे.पावसाळा तोंडावर असताना या रस्त्यांची कामे झाली नाही तर पावसाळ्यात वाहतूक ठप्प पडण्याची भीती होती.
अखेर जिल्हापरिषद सदस्या सौ.शिवानी संदीप सावंत यांनी या विषयाची गंभीर दखल घेत थेट प्रशासनाशी संपर्क साधला.संपूर्ण माहिती घेतली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र देऊन संबंधित रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.तसेच पावसाळ्यापूर्वी या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्यात यावी अशी मागणी देखील केली होती.फक्त पत्र देऊन त्या थांबल्या नाहीत तर संबंधित ग्रामस्थांना विश्वासात घेऊन जर काम सुरू झाले नाही तर थेट रस्त्यावर उतरण्याची तयारी देखील करण्यात आली होती.
सौ.शिवानी संदीप सावंत यांच्या एकाच पत्राने प्रशासन खडबडून जागे झाले आणि अवघ्या २४ तासात सावर्डे,अबीटगाव,मूर्तवडे या रस्त्याच्या कामाला बुधवारी सुरुवात करण्यात आली.ही माहिती मिळताच सौ.शिवानी सावंत,संदीप सावंत यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.काम उत्कृष्ट व दर्जेदार व्हावे आशा सूचना देत प्रशासनाचे आभार देखील व्यक्त केले.अशाचपद्धतीने अन्य दोन रस्त्यांची कामे देखील सुरू करावी अशी अपेक्षा सौ.सावंत यांनी व्यक्त केली आहे.
जि.प.सदस्या शिवानी संदीप सावंत यांच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे,रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात
