Uncategorizedजीबीएस' उद्रेकानंतर सरकारला जाग; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना, औषधांच्या उपलब्धतेवर भर !

जीबीएस’ उद्रेकानंतर सरकारला जाग; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना, औषधांच्या उपलब्धतेवर भर !

पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक ९ जानेवारी पासून सुरू झाला. त्यानंतर तीन आठवड्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे. आरोग्य विभागाने जीबीएस रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक आणि विरेंद्र सिंह यांनी या मार्गदर्शक सूचना २९ जानेवारीला काढल्या आहेत. या आजाराची राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली असून, आतापर्यंत दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.*

सूचना काय?
●क्षेत्रीय पातळीवर शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना करावी.
●आजाराचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा.
●प्रशासनातील विविध विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात.
●नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा.
●पुरेशा रुग्णशय्या आणि औषधांची उपलब्धता यांची खात्री करावी.
●उपचारासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत करावी.

Breaking News