ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सामना च्या मुंबई आवृत्तीचे सहायक संपादक विद्याधर चिंदरकर यांची दैनिक सामना च्या निवासी संपादक पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे मुख्य संपादक उद्धव ठाकरे यांच्या संमतीने कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी एका बैठकीत पदोन्नतीसह नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. विद्याधर चिंदरकर हे मागील सुमारे 33 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे.. अतिशय हुशार आणि एक अभ्यासू पत्रकार म्हणून आज मुंबई सह संपुर्ण महाराष्ट्रात त्यांची एक वेगळीच ख्याती आहे. काही वर्ष त्यांनी रत्नागिरी येथे पत्रकार म्हणून काम केले असल्याने आज मला त्याचा नक्कीच उपयोग होत असल्याचे विद्याधर चिंदरकर यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.खासदार तथा दैनिक सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे अगदी जवळचे आणि विश्वासू म्हणून आज त्यांच्या कडे पाहीले जाते… विद्याधर चिंदरकर यांची दैनिक सामनाच्या निवासी संपादक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा….
ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सामना च्या मुंबई आवृत्तीचे सहायक संपादक विद्याधर चिंदरकर यांची दैनिक सामना च्या निवासी संपादक पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे मुख्य संपादक उद्धव ठाकरे यांच्या संमतीने कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी एका बैठकीत पदोन्नतीसह नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे
