रत्नागिरीटपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी १५ सप्टेंबर रोजी पेन्शन अदालत

टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी १५ सप्टेंबर रोजी पेन्शन अदालत

रत्नागिरी,  (जिमाका):- टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ५७ वी पेन्शन अदालत १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीचे आयोजन मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्याद्वारे करण्यात आले आहे.
या अदालतीमध्ये निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी तसेच टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या आणि सेवेत असताना ज्यांचे निधन झाले आहे अशा टपाल विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधील निवृत्तीवेतनधारकांच्या गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर विचार केला जाईल. अदालतीमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे, ई-वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढवणे, धोरणात्मक शिस्तभंगाची प्रकरणे, डी.पी.सी. पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणे इत्यादींचा विचार केला जाईल.
निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या तक्रारीचे अर्ज वरिष्ठ लेखा अधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई-४००००१ येथे टपाल किंवा वैयक्तिकरित्या सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १९ ऑगस्ट २०२५ आहे. यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार केला जाणार नाही. इच्छुक निवृत्तीवेतनधारकांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधिक्षक, रत्नागिरी यांनी केले आहे.

Breaking News

‘सिंदूर रक्तदान महायात्रा’ ही भारतीय सैनिकांना रक्तदान करणारा देशातील पहिला उपक्रम-

जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर रक्तदान महायात्रेचा...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 11/08/2025

१) मंडणगड - 12.25 मिमी२) खेड - 21.42 मिमी३)...